Placeholder canvas
Friday, April 26, 2024
Homeविदेशमिस वर्ल्ड टोनी अ‍ॅन सिंगला डॉक्टर व्हायचं!

मिस वर्ल्ड टोनी अ‍ॅन सिंगला डॉक्टर व्हायचं!

Toni Ann Singh Miss World 2019,Toni Ann Singh,Toni,Ann, Singh,Miss World 2019,Miss world
Toni Ann Singh

लंडन : जमैकाच्या टोनी अ‍ॅन सिंग हीने मिस वर्ल्ड 2019 चा मुकुट पटकावला. लंडनमध्ये झालेल्या सोहळ्यात ही घोषणा करण्यात आली. या स्पर्धेत 120 देशांच्या सौंदर्यवतींनी सहभाग घेतला होता. पण अखेरच्या प्रश्नोत्तरांच्या फेरीत जमैकाच्या टोनी अ‍ॅन सिंगनं आपल्या उत्तरानं परीक्षकांची मनं जिंकत विश्वसुंदरीचा मुकुट आपल्या नावे केला. मिस वर्ल्ड टोनी अॅन सिंगने डॉक्टर बनायची इच्छा व्यक्त केली आहे.

या स्पर्धेत फ्रान्सची ओफिली मेजिनो उपविजेती ठरली तर भारताची सुमन राव तिसऱ्या स्थानावर राहिली. या स्पर्धेत 120 देशांच्या सौंदर्यवतींनी सहभाग घेतला होता. मिस यूनिव्हर्स 2019 नंतर शनिवारी रात्री उशीरा मिस वर्ल्ड 2019 ची घोषणा करण्यात आली. यावेळी शेवटच्या टॉप 5 मध्ये जमैका, फ्रान्स, भारत, ब्राझील, नायजेरिया या देशांच्या सौंदर्यवतींनी स्थान पटकावलं.

Suman Rao

मिस वर्ल्ड टोनी अ‍ॅन सिंग काय म्हणाली…

मिस वर्ल्ड टोनी अ‍ॅन सिंग म्हणाली, मी फ्लोरिडा स्टेट युनिव्हर्सिटीची सायकलॉजी विषयाची विद्यार्थीनी आहे. मला डॉक्टर व्हायचं आहे. ती म्हणाली, मला वाटतं मी ज्यांचं प्रतिनिधीत्त्व करते ते खूप खास आहे. मी अशा स्त्रियाचं प्रतिनिधीत्त्व ज्या जग बदलण्यासाठी पुढे येत आहेत. मी असं नाही म्हणत की मी सध्या ज्या मंचावर उभी आहे त्यांच्यापेक्षा मी वेगळी आहे. पण स्त्रियांसाठी काम करण्याची माझी तळमळ आणि आवड हे मात्र इतरांपेक्षा वेगळं आहे. तसेच मला ज्या संधी मिळाल्या आहेत. त्यातून मी हे सिद्ध केले आहे की मी इतरांसाठी एक चांगलं उदाहरण सेट करेन.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments