Placeholder canvas
Friday, April 26, 2024
Homeविदेशजागतिक सेक्स मार्केट वेगाने वाढतोय

जागतिक सेक्स मार्केट वेगाने वाढतोय

प्राचीन काळापासून जगभरात प्रत्येक देशात देहविक्रीचा व्यवसाय चालत आला आहे. आज हा व्यवसाय बरेचजण बेकायदेशीर पणे चालवतात. तर काही मंडळी कायदेशीरपणेही हा व्यवसाय चालवतात. यातील बरीच मंडळी या व्यवसायावर पोट भरत असतात. अनेकदा देहविक्रीत अल्पवयीन मुली दिसतात. गरिबीमुळे पालक आपल्या मुली हा व्यवसाय करणा-यांना विकतात. जगातील १२ देशांमध्‍ये सर्वाधिक सेक्स मार्केट सध्या चालत आहे. या विषयी माहिती जाणून घेऊ या… 

  1. चीन : ७३ अब्ज डॉलर
    जगात सर्वाधिक देह व्यापार चीनमध्‍ये होतो. मात्र येथे हा व्यवसाय बेकायदेशीर आहे. चीनमध्‍ये सरकार वेश्‍या व्यवसायात काम करणा-यांबरोबर गुन्हेगारांप्रमाणे वर्तन करते. वेळोवेळी छापे मारली जातात. मात्र असे असूनही चीनके मसाज पार्लर्स, बार आणि नाईट क्लब्समध्‍ये देह व्यापार वेगाने वाढत राहिला आहे.
  2. स्पेन : २६. अब्ज डॉलर
  3. यूएन विद्यापीठाच्या अहवालानुसार, ३९ टक्के स्पॅनिश पुरुषांनी एकदा वेश्‍याशी शरीरसंबंध ठेवले आहेत. २००९ मध्‍ये स्पेनच्या आरोग्या मंत्रालयाने एक सर्व्हे केला. यात ३२ टक्के पुरुषांनी हे मान्य केले आहे. हे प्रमाण हॉलंड व ब्रिटनच्या तुलनेत १४ टक्के अधिक आहे.

 . जपान : २४ अब्ज डॉलर 

देह व्यापार जपानच्या इतिहासासोबत जोडलेला आहे. १९५६ च्या अँटी प्रोजेक्ट अॅक्टनुसार, कोणताही व्यक्ती या व्यवसायात उतरु शकत नाही व ग्राहकही होऊ शकत नाही. कायदेशीर उणीवांमुळे जपानमध्‍ये सेक्स उद्योग सुरु झाला. हा उद्योग स्वत:ला देह व्यापार असे संबोधित नाही.

. जर्मनी : १८ अब्ज डॉलर 

एका अनुमानानुसार, जर्मनीत ४० हजार सेक्स वर्कर आहेत. येथे कायदे आहेत. मात्र सामाजिक स्थिती व अधिकारांशी संबंधित अनेक नियम आहेत. यात काम करणा-यांना इतर व्यवसायांप्रमाणे सामाजिक सुरक्षा मिळू शकते. देह व्यापारासाठी विवश करणे किंवा परिस्थितीचा लाभ उठवणे अपराध आहे.

 . अमेरिका: १४. अब्ज डॉलर

अमेरिकेत साधारणपणे देहव्यापार कायदेशीर आहे. मात्र नेवाडा राज्याच्या काही भागात हा व्यवसाय बेकायदेशीर आहे. अमेरिकेत देह व्यापारासाठी अधिकृतपणे अर्ज करता येऊ शकते. या व्यवसायाशी जोडलेल्या लोकांना टॅक्स, कर्मचा-यांचे संरक्षण, कमाल वेतन, वीमा, मेडिकल तपासाचे नियम पाळावे लागतात.

 ६. दक्षिण कोरिया : १२ अब्ज डॉलर

हा व्यवसाय दक्षिण कोरियात बेकायदेशीर आहे. मात्र कोरियन विमेन्स डेव्हलपमेंट इन्स्टीट्यूटच्या अहवाल एक वेगळेच चित्र समोर दाखवत आहे. दक्षिण कोरियात देह व्यापाराची उलाढाल १२-१३ अब्ज डॉलर इतकी आहे. येथे जीडीपीचा दर १.६ टक्के आहे. अहवालानुसार, दक्षिण कोरियातील २० ते ६४ वर्षांचे २० टक्के पुरुष महिन्यात सरासरी ५८० डॉलर देह व्यापारावर खर्च करतात.

 . भारत : . अब्ज डॉलर

लोकसंख्‍येच्या बाबतीत जगात दुस-या क्रमांकावर असलेला भारत हा देश देह व्यापाराशी संबंधित कायदे फार गुंतागुंतीचे आहे. पैशांसाठी सेक्स करणे कायदेशीर आहे. मात्र सार्वजनिक ठिकाणी, हॉटेलमध्‍ये असे करणे वेश्‍या व्यवसायाला प्रोत्साहन देण बेकायदेशीर आहे. खासगी ठिकाणी तरुणीसोबत तिच्या संमतीने सेक्स करणे कायदेशीर आहे.

. थायलंड :. अब्ज डॉलर 

देशही सेक्स टुरिझ्मसाठी प्रसिध्‍द आहे. थायलंडमध्‍ये देह व्यापार कायदेशीर आहे. येथे खास ठिकाणांवर देह व्यापाराला परवानगी आहे. स्थानिक अधिकारी कधीमधी यात काम करणा-यांना संरक्षणही देतात. व्हिएतनाम युध्‍दानंतर थायलंड सेक्स टुरिझ्मसाठी प्रसिध्‍द आहे.

 . फिलिपीन्स: अब्ज डॉलर 

देह व्यापार फिलिपीन्समध्‍ये बेकायदेशीर आहे. मात्र सर्वांना माहिती आहे, की फिलिपीन्स सेक्स टुरिझ्मसाठी कशा प्रकारे बदनाम आहे. प्रचंड गरिबी व इंटरनेट सहज पोहोचल्याने हा देश सेक्स टुरिझ्मसाठी चुंबकप्रमाणे बनला आहे. मुले व अल्पवय मुलीही याचा बळी ठरत आहे.

 १०. तुर्कस्तान अब्ज डॉलर

तुर्कस्तानमध्‍ये देह व्यापाराबाबतचा कायदा आहे. मात्र या व्यवसायाला प्रोत्साहन देण्‍यावर बंदी आहे. तुर्कस्तानचा स्थलांतर कायदा देह व्यापारासाठी देशात कोणालाही प्रवेश देत नाही. मात्र असे असूनही तुर्कस्तान १० व्या क्रमांकावर आहे.

 ११. स्वित्झर्लंड : . अब्ज डॉलर

स्वित्झर्लंडमध्‍ये देह व्यापाराच्या ठिकाणाला साधारणपणे ‘सेक्स रुम’ असे संबोधले जाते. यातून सरकारला आर्थिक मदतही होते. हे शहराच्या बाहेर असतात. येथे शॉवर, लॉकर, डेस्क आणि वॉशिंग मशीनही असतात. झुरिच शहराने देह व्यापाराचे केंद्र शहरापासून लांब वसवण्‍यासाठी २६ लाख डॉलरही दिले.

१२. इंडोनेशिया : .२५ अब्ज डॉलर 

इंडोनेशियात देहविक्री व्यापार बेकायदेशीर आहे. यास नैतिक अपराध मानले जाते. मात्र असे असूनही मुस्लिम बहुल इंडोनेशियात देह व्यापार बराच पसरला व संघटित झाला आहे. युनिसेफनुसार इं‍डोनेशियामध्‍ये देह व्यापारात ३० टक्के अल्पवयीन मुली आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments