Placeholder canvas
Friday, April 26, 2024
Homeविदेशमासिक पाळीमुळे तरुणीला विमानातून उतरवले!

मासिक पाळीमुळे तरुणीला विमानातून उतरवले!

लंडन। मासिक पाळीमुळे पोट दुखत असल्याची तक्रार करणाऱ्या एका महिला प्रवाशाला व तिच्या प्रियकराला क्रू मेंबर्सनी जबरदस्तीने विमानातून उतरवल्याची धक्कादायक घटना इंग्लंडमध्ये घडली आहे. बेथ ईवेंस (२४) असे तरुणीचे नाव असून जोशुआ मोरान (२६) असे तिच्या प्रियकराचे नाव आहे.

बेथ आणि जोशुआ हे जोडपं १७ फेब्रुवारीला इंग्लडहून दुबईला जाण्यासाठी विमानात बसले होते. त्याचवेळी मासिक पाळीमुळे पोटात दुखू लागल्याचे बेथने एअर हॉस्टेसला सांगितले. पण तिला वेदमाशमक गोळी देण्याऐवजी एअर ह़ॉस्टेस तिच्या अंगावरच धावून गेली.

एअर हॉस्टेसच्या संतापामुळे बेथ घाबरली व रडू लागली. त्यानंतर इतर क्रू मेंबर्सही तिथे आले. त्यांनी बेथ व जोशुआला विमानातून उतरण्यास सांगितले. यास बेथने विरोध करताच क्रूने त्या दोघांना अक्षरश: ढकलत विमानाच्या दरवाजापर्यत नेले व खाली उतरण्यास भाग पाडले.

इंग्लडमधील स्थानिक वृत्तपत्र टाईम्स ऑफ लंडनने याबद्दल वृत्त प्रसिद्ध केले आहे. यात मासिक पाळीमुळे तरुणीला विमानाबाहेर काढणे अयोग्य असल्याचे बेथच्या कुटुंबियांनी व मोरानने म्हटले आहे.
क्रू मेंबर्सने आम्हांला जबरदस्तीने विमानातून उतरवल्याने पुन्हा दुसरे तिकीट घेण्यासाठी ३५० डॉलर्स (२२७६८) खर्च करावे लागल्याचेही बेथने सांगितले. तर अमीरात एअरलाईनने बेथला तात्काळ वैद्यकीय उपचारांची गरज असल्याने विमानातून उतरवल्याचा दावा केला आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments